प्रतिनिधी/सांगली
सांगली जिल्ह्यात 1 जून अखेर अत्यावश्यक असणाऱ्या 1802 उद्योग घटकांना व यातील 23 हजार 390 कर्मचाऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे. यात एमआयडीसी मधील 920 उद्योग घटक व 11 हजार 602 कर्मचारी तर या व्यतिरिक्त 882 उद्योग घटक व 11 हजार 788 कर्मचारी यांचा समावेश आहे व त्यांनी मागणी केलेल्या 393 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
यामध्ये अत्यावश्यक उद्योग घटकांमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादन करणारे उद्योग, डेअरी, पशु/पोल्ट्रीखाद्य उद्योग, कोल्ड स्टोअरेज/वेअर हाउस, कॉरोगेटेड बॉक्स उत्पादन, औषधे व वैद्यकीय साधने उत्पादन, इतर- पॅकिंगशी सबंधित उद्योग, यांचा समावेश आहे.