प्रतिनिधी/कडेगाव
तालुक्यातील आंबेगाव येथील ३६ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आंबेगावसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर तालुक्यात प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या असून संपुर्ण आंबेगाव सील करण्यात आले आहे. तर संपूर्ण परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर आज जिल्ह्यात चार जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबेगाव येथील मुंबईस्थित व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती (दि.२४ मे रोजी) मुंबईहुन आंबेगाव (ता. कडेगाक) येथे आली होती. तर (दि.२५ मे रोजी) उपचारासाठी त्याला मिरज येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. तर सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने आंबेगाव येथे आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. तर आरोग्य विभाग सतर्क झाले असून संपूर्ण गावात उपाय योजना सुरू केल्या केल्या आहेत. ग्रामपंचायती मार्फत गावात औषधांच्या फवारणी करण्यात आल्या आहेत. तर संपूर्ण गाव सीलबंद करण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बनपुरीतील दोन, कचरेवाडीतील एकाला कोरोना
दरम्यान आंबेगाव येथील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसिलदार डॉ. शैलजा पाटील, आरोग्य अधिकरी माधव ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी तात्काळ भेट देऊन उपाय योजना सुरू केल्या आहेत. तर संपूर्ण गाव कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








