प्रतिनिधी/ खानापूर
गांधीनगर येथे केएलई महाविद्यालयाच्या आवारात एक गाय मृत्युमुखी पडली होती. याची माहिती श्रीराम सेना हिंदूस्थान व इतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी एकत्र येऊन गायीचा अंत्यविधी उरकला.
यावेळी परशराम पाटील, सानुर शिगाडे, सिद्राय अंकलगी, आकाश अथणीकर, मंगलदास गोसावी, सागर अष्टेकर, किरण अष्टेकर व गांधीनगरमधील नागरिक उपस्थित होते. हा अंत्यविधी विधीपूर्वक करण्यात आला.









