एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 624 वर, 279 जण बरे तर 282 रुग्णांवर उपचार सुरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात आज, नव्याने 16 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 10 पुरुष, 6 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाने 63 वा बळी घेतला आहे. आज 2 तर आतापर्यंत 279 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 624 वर पोहचली आहे. उर्वरित 282 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यापैकी कुर्बान हुसेन नगर, करनिक नगर, उत्तर कसबा, जुने विडी घरकुल ,समाधान नगर अक्कलकोट रोड परिसरातील मृत व्यक्ती आहेत. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये गीता नगर 1, दाजी पेठ 4,न्यू बुधवार पेठ 1,रेल्वे लाईन्स 1, बाळीवेस 3, भवानी पेठ 1, मराठा वस्ती भवानी पेठ 1, एमआयडीसी परिसर 1, पाच्छा पेठ 1, कुमठा नाका परिसर 1, जामगाव तालुका बार्शी 1 असे या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 151 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 135 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 624 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 345 पुरुष तर 279 स्त्री आहेत. 282 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 63 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 279 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन- 7419
एकूण अहवाल प्राप्त : 5890
आतापर्यंत अहवाल निगेटिव्ह : 5266
आतापर्यंत अहवाल पॉझिटिव्ह : 624
उपचार सुरू- 282
बरे होऊन घरी गेले : 279
मृत- 63
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









