नवी दिल्ली
दीपक फर्टिलायझर ऍण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन(डीएफपीसीएल) यांनी कोरोरिड नावाच्या ब्रँडसोबत सॅनिटायझर बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. 500 मिलीलिटर, एक लिटर, पाच लिटर, 10 लिटर, 20 लिटर, 25 लिटर आणि 200 लिटरपर्यंत हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदरचे सॅनिटायझर हे अँटी बॅक्टेरिया, अँटीफंगल आणि अँटी व्हायरस स्वरूपाचे आहे. याचा वापर शरिरावर करणे उपयुक्त असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.









