वेतवडे/प्रतिनिधी
धामणी खोऱ्यातील आकुर्डे ता. पन्हाळा येथे मराठी शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केलेल्या पृथ्वीराज सरदार पाटील (वय 28) या तरुणाचा आज ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. धामणीखोऱ्यातील बळपवाडी,पणुत्रे व हरपवडे पैकी निवाचीवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याने आसपासच्या गावात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना स्थानिक शाळांमध्ये क्वारंटाईन केले जात आहे. त्याप्रमाणे आकुर्डे (ता. पन्हाळा ) येथे १३ मे रोजी पुणे येथून आल्यानंतर पृथ्वीराज सरदार पाटील या तरुणास शाळेत क्वारंटाईन केले होते आज त्याने तेरा दिवस पुर्ण केले होते आणि उद्या तो आपल्या घरी जाणार होता. परंतु आज मंगळवारी सकाळी 11 वाजता त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने सीपीआर येथे हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण धामणीखोऱ्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
Previous Articleमहाराष्ट्रातील 1889 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
Next Article कराड तालुक्यातील चार बाधित कोरोनामुक्त








