ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावर परिणामकारक ठरलेल्या मलेरियावरील ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ या औषधांची क्लिनिकल ट्रायल बंद करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.
सध्या जगभरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर केला जातो. हे औषध मूत्रपिंड, हृदय आणि यकृतावर परिणाम करते. तसेच या औषधाच्या वापरामुळे कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनवर बंदी आणली आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल बंद करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत.
मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर शरीरासाठी धोकादायक धोकादायक असल्याचे मिलर फॅमिली हार्ट संस्थेचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. स्टीवननिसेन यांनी सांगितले.









