जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापुरात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नव्याने १३ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ९ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ६२१ वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज १०५ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकूण ५ हजार ८४४ जणांचे तपासणी करण्यात आली. यातील ६२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकूण ५ हजार २३३ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. एकूण ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही आकडेवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ची आहे. उर्वरित माहिती जिल्हाधिकारी शंभरकर संध्याकाळी देणार आहेत.