ब्लूमर्गच्या अहवालातून माहिती :30 अब्ज डॉलर्सची वाढ : समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ कॅलिर्फोनिया
मागील काही दिवसांपासून फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग भारतामध्ये विशेष चर्चेत राहिले आहेत. कारण त्यांनी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी जिओमधील 10 टक्क्मयांची हिस्सेदारी विकत घेतली आहे.
झुकरबर्ग यांच्या वरील घटना घडलेल्या असल्या तरी मागील दोन महिन्यात मात्र त्यांची संपत्ती 30 अब्ज डॉलर्सनी वधारली असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या अहवालामधून पुढे आली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत त्यांची एकूण संपत्ती 57.5 अब्ज डॉलर होती. सध्या त्यांची संपत्ती जवळपास 87.5 अब्ज डॉलरच्या घरात राहिली आहे. जगातील तिसऱया नंबरच्या स्थानी बर्कशायर हॅथवेचे चेअरमन वॉरन बफेट यांच्याही पुढे झुकरबर्ग यांनी बाजी मारली आहे.
शॉपिंग फिचरचा प्रारंभ
फेसबुककडून आपली ऑनलाईन शॉपिंग फिचर शॉपची सुरुवात केली आहे. तेव्हापासून त्यांच्या समभागाची किंमत ऑल टाईम उच्चांकी राहिली आहे. फेसबुकचा एक समभाग 230 डॉलरच्या मूल्यावर पोहोचला आहे, अशी माहिती सीएबीसीच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
वर्क फ्रॉम होमसाठीही चढाओढ
कोविडच्या कारणामुळे जगातील बहुतांश लोक हे वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून काम करण्याची सुविधा वापरुन अनेकजण आपल्या कार्यालयातील काम करत आहेत. यासाठी वापरण्यात येणाऱया फिचरमध्ये झूम ऍपचा वापर केला जात आहे. परंतु त्याला टक्कर देण्यासाठी फेसबुकने मॅसेंजर रुम्स नावाचे फिचर सुरू केले असून, याचा वापर करून एकावेळी 50 लोकांना व्हिडीओ कॉलमधून चर्चा करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.









