प्रतिनिधी / चुये
निगवे खा. ता करवीर येथील एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील सर्व व्यवहार तात्काळ बंद ठेवुन गावच्या सर्व सीमा बंद करुन लॉकडउन केले आहे.
दहा हजार लोकसंख्या असलेलं परिसरातील मोठे गाव आणि बिद्री साखर कारखान्याच्या करवीर तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील या गावाची ओळख आहे. त्यामुळे या गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडालेली आहे. सोमवारी पहाटे आयोगाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी वार्यासारखी पसरली. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक दक्षता समितीने तात्काळ या गावच्या सर्व सीमा बंद करून सर्व व्यवहार दुकाने बंद ठेवण्याची आव्हान केले आहे.
कोरोनाबाधित रुग्ण हा पंधरा दिवसांपूर्वी मुंबईवरून आपल्या कुटुंबासमवेत गावी आला होता. गावात आल्यानंतर त्यांना तात्काळ प्राथमिक शाळेत पूर्ण कुटुंबाला अल्गीकरण केले होते. यापूर्वी तीन वेळा त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. चार दिवसापूर्वी त्याला त्रास जाणवू लागल्याने सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी पहाटे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती इस्पुरली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्यांना व स्थानिक दक्षता समितीला दिली. त्यानंतर तात्काळ स्थानिक दक्षता समितीने खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधित उपाय योजना सुरू केलेली आहे
परिसराने घेतला धसका..
परिसरातील प्रमुख गाव म्हणून असलेल्या निगवे खालसा गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व गावच्या दक्षता समितीनी याची गंभीर दखल घेऊन ग्रामस्थांना घराबाहेर पडू नका खबरदारी घ्या असे आवाहन केले आहे.








