प्रतिनिधी/ बेळगाव
बेलगाम-वनमध्ये गेली अनेक वर्षे काम केले. मात्र प्रसुतीसाठी रजा घेतल्यानंतर पुन्हा त्या कामावर रुजू करुन घेण्यास विरोध होत आहे. त्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली असून मला पुन्हा कामावर घ्या, अशी मागणी वैशाली कोणे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
वैशाली कोणे या रिसालदार गल्ली येथील बेलगाम-वन या केंद्रामध्ये अनेक वर्षे सेवा बजावली आहे. त्या प्रसुतीसाठी 18 सप्टेंबर 2019 पासून रीतसर परवानगी घेवून रजेवर गेल्या. त्यानंतर त्या पुन्हा रुजू होण्यासाठी गेल्या असता त्यांना कामावर रुजू करुन घेण्यास नकार दिला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर बघू असे आश्वासन दिले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या धडपडत आहेत. मात्र त्यांना घेण्यास टाळाटाळ सुरु आहे. तेंव्हा संबंधित बेलगाम-वनच्या अधिकाऱयांना सूचना करुन कामावर रुजू करुन घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोहन कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.









