प्रतिनिधी / पणजी
पर्यटन हंगाम्यात राज्यातील हॉटेल व्यवसायिकांना अधिक फ्ढायदा होतो. यावर्षी मात्र हंगामा संपता संपता कोरोना कोव्हिड 19 विषाणू रोगाने सर्वत्र थैमान घातल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले. याचा अधिक फ्ढटका या क्षेत्राला बसला असून आता लॉकडाऊन सुरु केले तरीही केवळ हंगाम्यात सुरु करण्यात येणाऱया हॉटेलांना त्याचा काहीही फ्ढायदा होणार नाही. राज्यातील समुद्रकिनाऱयाजवळील फ्ढक्त पर्यटन हंगाम्यात सुरु करणारे हॉटेल, रेस्टॉरंट झाकण्यात आले आहेत.
एप्रिल आणि मे महीन्यात देशी पर्यटकांची संख्या दरवर्षी अधिक असते. शाळांना सुट्टी असल्याने अनेकजण फ्ढिरण्यासाठी या महीन्यात बाहेर जातात. परंतु यावर्षी कोरोनामुळे कुठेही जाता आले नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी लॉकडाऊन संपण्याची वाट या महीन्यात बघीतली होती पण लॉकडाऊन अधिक काळ वाढल्याने आता व्यावसायस होणार नाही हे जाणून त्यांनी हॉटेल बंद केले आहे.
गोव्यातील समुद्रकिनाऱयावर अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट लाकडापासून बांधण्यात येतात. यामुळे त्याची शोभा अधिक वाढते आणि ते आकर्षित †िदसते. असे हॉटेल, रेस्टॉरंट पावसात खुले ठेवणे तेवढे सोपे नसते. पाण्यापासून सुरक्षिकत असलेल्या लाकडांचा वापर केला असला तरीही धोका फ्ढारसा टळत नाही. त्यामुळे अधिक काळ टिकणारे लाकूड कमी काळ टिकू शकते. जून महीन्यापासून पावसाळा सुरु होत असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून राज्यातील समुद्रकिनाऱयाजवळील हॉटेलना झाकण्याचे काम सुरु झाले आहे.









