वृत्तसंस्था/ मिलान
इंटर मिलान, एफसी बायर्न व रियल मादिद या युरोपमधील तीन बडय़ा फुटबॉल क्लब्सनी पुढील वर्षी युरोपियन सॉलिडॅरिटी चषक स्पर्धा संयुक्तपणे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकसंधतेचा संदेश देणे हा या स्पर्धेचा उद्देश असून यातून मिळणारे उत्पन्न वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिले जाणार आहे.
फुटबॉल कॅलेंडरमध्ये उपलब्ध असलेला वेळ पाहून आणि प्रेक्षकांसमोर खेळण्याची परवानगी केव्हा मिळते, याचा विचार करून ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यातील तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध राऊंडरॉबिन पद्धतीने प्रत्येकाच्या शहरात खेळतील. मिलान (इंटर वि. एफसी बायर्न), माद्रिद (रियल वि. इंटर), म्युनिच (एफसी बायर्न वि. रियल माद्रिद) येथे हे सामने खेळविण्यात येतील.









