तापमान अधिक असल्याने पोलीस झाले सतर्क
प्रतिनिधी / पेडणे
पञादेवी चेक नाक्मयावर गोव्यात येत असलेल्या औषधे वाहतूक करणाऱया ट्रकचा चालक व क्लिनर या दोघांना तपासणी केली असता हे दोघेजणांचा तपामान मर्यादेपेक्षा जास्त मिळल्याने या दोघांना गेटवरील आरोग्य खात्याच्या कर्मचारी व पोलिसांनी बाजूला थांबवून आपल्या वरि÷ाना याची माहिती दिली.
महाराष्ट्र येथून आलेल्या औषध घेऊन आलेल्या या गाडिला सॕनिटायझर करण्यासाठी तात्काळ पेडणे अग्निशमक दलाला प्राचारण करण्यात आले. पेडणे आग्निशमक दालाचे जवान प्रशांत देसाई, विष्णूदत्त परब , अमोल परब यांनी हे औषध वाहतुक करणरे वाहनाचे निर्जतुकीकरण केले.
ड़ यामुळे पञादेवी चेक नाक्मयावर भितीचे वातावरण पसरले आहे. सदर औषध वाहतूक करणाऱया वासनावरील चालक व क्लिनर हे कोरोना बाधीत आहेत की नाहीत याबद्दल संशय असून या दोघांनाही क्वारांटाईन करण्यात आले आहे.









