वार्ताहर / आडोली
राधानगरी तालुक्यात वाकीघोल परिसरात कोरोणाने शिरकाव केल्याने येथील 14 वाड्या वस्तीवरील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गावठाणवाडी पैकी आडसोळवाडी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असलेचे राधानगरी येथील आरोग्य केंद्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबधीत व्यक्तीच्या भावाचे आठ दिवसांपूर्वी याच ठिकाणी निधन झाल्याने परगावाहून अनेक व्यक्ती अंत्यविधी करता आल्या होत्या. यामध्ये या व्यक्तीचा समावेश होता. त्यावेळी खबरदारी म्हणून अनेकांना होम क्वाँरंटाईन केले होते. तपासणीनंतर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मयत व्यक्ती प्रतिष्ठित असलेने त्यांचे घरी अनेक जण विचारपूस करण्यासाठी गेले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत असून त्याची प्रशासनामार्फत चौकशी केली जात आहे. सद्या कोरोना बाधित ही व्यक्ती परिसरातील अनेक गावांमधून फिरत होती अशी माहिती पुढे येत आहे.
कोरोना पॅाझिटीव्ह रुग्ण वाकिघोल परिसरात सापडलेने खबरदारी म्हणून या परिसरात 14 वाड्या – वस्त्या मधील सर्व व्यवहार सलग चार ते पाच दिवस बंद करण्याचा निर्णय करोना दक्षता कमिटीने घेतला असून सर्वांनी खबरदारी घ्यावी व घरीच थांबावे असे आव्हान कमिटी मार्फत करण्यात आले आहे.








