प्रतिनिधी / कुडाळ:
श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट (वालावल) व प्रगत सिंधुदुर्ग (मुंबई) च्यावतीने कुडाळ पंचायत समिती कार्यालयाला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली. सभापती नूतन आईर यांच्या हस्ते आणि चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांच्या उपस्थितीत या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
चौधरी व सचिव संदीप साळसकर यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ही मशीन बनविण्यात आली आहे. सभापती सौ. आईर यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. जि. प. सदस्य संजय पडते, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, चौधरी, साळसकर, पं. स. माजी सदस्य अतुल बंगे, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, अमित तेंडोलकर, रवी पोवार, संदेश कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.









