प्रतिनिधी/ बेळगाव
रामतीर्थनगर येथे असलेल्या सरकारी हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन करण्यासाठी काही जणांना ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या वसतिगृहाच्या सभोवताली रहिवासी वसती आहे. तेव्हा त्या ठिकाणी क्वारंटाईन करू नये, अशी मागणी रामतीर्थनगर येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परराज्यांतून अनेक जण शहरामध्ये दाखल होत आहेत. कोरोनासारख्या आजारामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच परराज्यांतून आलेल्यांना भर वस्तीच्या ठिकाणी क्वारंटाईनसाठी ठेवण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तेव्हा शहराच्या बाहेरच क्वारंटाईनसाठी जागा निवडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सी. एस. बिदनाळ, सुरेश यादव, व्ही. डी. सालीमठ, ऍड. एम. टी. पाटील, महांतेश कुलकर्णी, बी. जी. तायकर, दुंडाप्पा मुचंडी, एस. व्ही. भुपे, व्ही. व्ही. चिकमठ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









