प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅशलेश व्यवहारांना महत्त्व आले आहे. डिजीटलायझेशनच्या युगात लॉकडाऊनमुळे बँक कर्मचाऱयांचे काम वाढले आहे. एक प्रकारे बँक कर्मचाऱयांनी आर्थिक योद्धा ही भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे मत सीटीझन्स कौन्सिल फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांनी व्यक्त केले.
फोरमतर्फे शनिवारी समादेवी गल्ली येथील सारस्वत बँकेमध्ये कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेंडोलकर बोलत होते. या प्रसंगी फोरमचे सदस्य सेवंतीलाल शाह, विजय आचमनी, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सतीश तेंडोलकर म्हणाले, लॉकडाऊनचा विचित्र असा काळ आपण सर्वांनीच अनुभवला. पण या काळातही पोलीस, डॉक्टर, प्रशासन, निमवैद्यकीय घटक, आरोग्य सेवक, पत्रकार हे सदैव कार्यरत होते. या सर्वांचेच आपण अभिनंदन करायला हवे. बँक कर्मचाऱयांनीसुद्धा आर्थिक योद्धा म्हणून या काळात उत्तम कामगिरी बजावली. लॉकडाऊनमुळे लोकांना बँकेपर्यंत येणे शक्मय नव्हते. परंतु बँकेने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. बँक हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे तुमचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे.
सेवंतीलाल शाह यांनी आजपर्यंत अनेक कारणास्तव संचारबंदी अनुभवली. परंतु लॉकडाऊनसारखा कठीण काळ प्रथमच अनुभवला. या काळात बँक कर्मचाऱयांनी उत्तम काम केले. आपण सर्वांनीच एकत्र काम करून पुढे जाणे शक्मय आहे. ज्याला जे जमेल त्याने ते काम करत राहिले पाहिजे. तुम्ही सर्व जण यापुढेही अशीच सेवा ग्राहकांना द्यावी, असे सांगितले.
बँकेतर्फे मुख्य व्यवस्थापक व्ही. एम. चंदगडकर यांनी स्वागत केले. त्यांच्यासह व्यवस्थापक आर. ए. देसाई, उपव्यवस्थापक ओ. ए. खासनीस, अधिकारी एस. एस. पंडित, महिला अधिकारी व्ही. एस. गांगोडकर, एस. पी. तेंडोलकर, ए. ए. मरडी, पी. जी. निकाळजे, आर. पी. शिरगुरी तसेच जे. एस. पाटील, सुरक्षा रक्षक आय. बी. सक्कण्णावर, ए. बी. बन्नूर, आर. डी. पाटील यांचा सतीश तेंडोलकर, सेवंतीलाल शाह, विजय आचमनी व अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱयांचा तसेच सुरक्षा रक्षकांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कर्मचाऱयांतर्फे कोप्पळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सिटीझन्स कौन्सिलने बँक कर्मचाऱयांच्या कामाची नोंद घेऊन सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.









