अथणी तालुक्मयात आहेत क्वारंटाईनमध्ये
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर वेगवेगळय़ा राज्यातील मजुर, कामगार, कष्टकरी बेळगाव जिह्यात अडकले आहेत. त्यांना वेगवेगळय़ा गावांत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी परप्रांतिय कामकारांची भेट घेवून त्यांची विचारपूस केली.
अथणी तालुक्मयातील संक्रट्टी येथील प्राथमिक शाळेत उत्तराखंडमधील कामगारांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. लक्ष्मण सवदी यांनी शाळेला भेट देवून त्यांची विचारपूस केली. त्यांच्या आरोग्याची स्थिती व त्यांना होणारा अन्न पुरवठा व्यवस्थीत होतो का? याची माहिती घेतली.









