प्रतिनिधी / वडूज
स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य लोकांच्यामध्ये कोरोना जागृतीचे गाव पातळीवर काम करणार्या कोरोना रक्षकांना वार्यावर सोडणार नाही असे ठोस प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
वडूज येथील पंचायत समिती सभापती निवासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आरोग्य सेवकांना संरक्षक किट वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री. घार्गे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते, माजी नगरसेवक अभय देशमुख, धनंजय क्षीरसागर, महेश गोडसे, तानाजी पवार उपस्थित होते.
घार्गे म्हणाले, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे प्रत्येकजण स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी एकमात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका हे घटक प्रामाणिकपणे घरोघरी जावून जनजागृती करत आहेत. यापैकी काही लोक अतिशय अल्प मोबदल्यात काम करत आहेत. अश्या लोकांना दिलासा देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून तसेच व्यक्तिगत पातळीवर चांगल्या पध्दतीने मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे.
यावेळी कलेढोन कुटीर रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. समीर तांबोळी, डॉ. संतोष मोरे, आरोग्य सहाय्यक धनंजय जवंजाळ, जयप्रकाश पाटील, नारायण जाधव, महादेव खरमाटे, नितीन निकम, प्रवीण खाडे, प्रवीण देशमुखे उपस्थित होते.
खरशिंगे गावास मास्क, सॅनिटायझर भेट
ज्या खरशिंगे गावात खटाव तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला त्या गावात प्रभाकर घार्गे यांनी गावातील सर्व लोकांना मास्क तसेच प्रत्येक घरासाठी सॅनिटायझर बॉटलचे मोफत वाटप आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना आरोग्य किट वाटप करताना माजी आमदार प्रभाकर घार्गे समवेत जि. प. उपाध्यक्ष प्रदिप विधाते, अभय देशमुख व इतर.