कुर्डुवाडी / प्रतिनिधी
शहरातील बालोद्यान चौकात असलेल्या बारदानाच्या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील बारदाना जळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शुक्रवारी दि. १५ रोजी दु.३ वा. सुमारास घडली. आग नेमकी कशाने लागली याचे कारणमात्र समजू शकले नाही. यावेळी जमलेल्या तरूणांनी आग विझवण्यासाठी तत्परता दाखवल्याने याची झळ इतर दुकांनाना बसली नाही.
लाॅकडाऊनमध्ये जनता कर्फ्यु पुकारण्यात आल्यामुळे सर्व दुकाने बंद होती. परिसर सर्व शांत असताना दुपारी ऐन उन्हाच्या तडाख्यात बारदान्याच्या दुकानाला आग लागली. जवळच हाकेच्या अंतरावर असलेले दीपक पेट्रोलियम चे मालक अमोल जगदाळे यांना ही माहिती मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह पंपातील फायर फायटर घेऊन मदतीसाठी धावले आणि फायर फायटरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सौरभ परबत यांनी पाण्याचा टँकर व विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा अ्ग्नीशमन बंबांच्या सहाय्याने परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
दुकानामध्ये सुमारे एक लाख रुपयांचा साखर बारदाना होता. लाॅकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचण होती. यामध्ये बारदाना जळाल्याने मोठी भर पडली आहे. शासनाकडून भरपाई मिळावी. अशी मागणी दुकानदार बबलु शेंडे याने केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








