कार्यान्वित केल्यापासून मशिन बंदच : मशिनाविना कराव्या लागतात चाचण्या
प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सोमवारपासून बाहय़रूग्ण विभाग (ओपीडी) ला प्रारंभ झाला आणि या इस्पितळात कोरोना व्हायरस चाचणी विभाग देखील सुरू करण्यात आला आहे. या विभागासाठी लाखो रूपये खर्च करून कोरोना संशयितांच्या थुंकीची चाचणी घेण्यासाठी आणलेले अत्याधुनिक ‘बायोसेफ्टी मशिन’ सद्या शोभेचे वस्तू बनले आहे. हे मशिन चालत नसल्याने येथे काम करणाऱया लॅब टॅक्निशियनच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हाती आलेल्या माहितीप्रमाणे, हे नवे कोरे बायोसेफ्टी मशिन गेल्या दोन दिवसामागेच कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यानंतर लगेच ते व्यवस्थितीत चालते की नाही याची खातरजमा केली पाहिजे होती. ती करण्यात आलेली नाही. जेव्हा लॅब टॅक्निशियन प्रत्यक्ष चाचणीसाठी गेले असता, हे मशिन चालत नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे लाखो रूपये खर्च करून आणलेले हे मशिन सद्या शोभेची वस्तू बनले आहे.
मशिनविना चाचणी करण्याचा सल्ला
बायोसेफ्टी मशिन हे कोरोना व्हायरसच्या संशयित रूग्णांचे नमूने घेतल्यानंतर चाचणीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. जेव्हा हे मशिन चालत नसल्याचे लॅब टॅक्शिशियननी संबंधित डॉक्टरांच्या नजरेस आणून दिले, तेव्हा त्यांना मशिन नसतानाच चाचणी करावी व ती कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती ‘गुगल’वरून ऑनलाईन घ्यावी असा सल्ला देण्यात आला.
बायोसेफ्टी मशिनद्वारे घेतली जाणारी चाचणी ही अचूक असते. मात्र, कोरोना व्हायरस हा अत्यंत घातक असल्याने मशिनविना चाचणी घेणे म्हणजे येथे काम करणाऱया लॅब टॅक्शिशियनच्या जीवाशी मांडलेला खेळ ठरू शकतो. सद्या या लॅबमध्ये काम करणाऱया टॅक्शिशियनना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूर्ण पीटीए किट दिलेला आहे. तरीसुद्धा बायोसेफ्टी मशिनची चाचणी घेऊन लवकर कार्यान्वित करावी अशी त्यांची मागणी आहे.
लॅबमध्ये भेडसावतात विजेसह अनेक समस्या
नव्या जिल्हा इस्पितळात सद्या पिण्यासाठी पाणी नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असतो. तसेच वातानुकूलीत यंत्रणा नसल्याने समस्येत अधिक भर पडलेली आहे. खास करून कोविड-19च्या नमून्यांची चाचणी घेणाऱया लॅबमध्ये अखंडित वीज पुरवठा व वातानुकूलीत यंत्रणा असणे खूप गरजेचे आहे. या इस्पितळाचे अद्याप मोठय़ा प्रमाणात काम बाकी असून सद्या ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी धडपड सुरू आहे.
दिवसभरातील चाचण्यांची संख्या वाढतेय दक्षिण गोव्यात चिखली येथे बायोसेफ्टी मशिन कार्यान्वित आहे. या ठिकाणी कोरोना संशयिताच्या थुंकीची चाचणी घेतली जाते. गोव्यात सद्या कोरोंटाईन करण्यात येणाऱयांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे पटापट चाचण्या करण्याची पाळी लॅब टॅक्शिशियनवर आलेली आहे. एका नमून्याच्या चाचणीसाठी तीन टप्पे पार करावे लागतात. या प्रक्रियेला किमान दीड तास लागतो. दिवसाला †िकमान 40 चाचण्यापूर्ण व्हायला पाहिजे असा नियम आहे. मात्र, बऱयाच वेळा शंभरच्या आसपाससुद्धा चाचण्या केल्या जातात









