प्रतिनिधी/सातारा
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 121 कडे गेला आहे. दारूची दुकाने बंद असल्याने थोडी तरी लगाम बसला आहे. मात्र, आज सकाळ पासून सोशल मीडियावर जिल्ह्यातील दारूची दुकाने उद्यापासून सुरू होणार, जिल्हाधिकारी यांची सही झाली अशी चर्चा रंगू लागताच सोशल मीडियावर टिप्पणी सुरू झाली आहे.
दारूतून राज्य शासनाला उत्पन्न मिळत असले तरीही त्या पासून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत आणि होत आहेत. लॉक डाऊन मध्ये ही दुप्पट तिप्पट दराने दारू विक्री होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन तीन कारवाया केल्या तेवढ्याच. मात्र शासनाच्या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू करण्यात आली नव्हती. त्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे कौतुक जिल्हावासीयांनी केले. मात्र, आज सकाळ पासून सोशल मीडियावर दारूची दुकाने उद्यापासून सुरू होणार अशी चर्चा सुरु झाली.त्यामुळे काहीं दारू दुकानदारानी उद्याच्या तयारीचे फोटो ही टाकले. जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू झाली तर कोरोना आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही सातारकर नागरिकांनी तर त्यावर टिपण्यावजा कॉमेंट ही केल्या आहे. दुपारपर्यंत दारूच्या दुकाने सुरू होणार की आहे तशीच बंद ठेवणार हे अधिकृत समजू शकले नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








