प्रतिनिधी/शाहुवाडी
गेले दोन महिने पूर्णतः बंद असलेली मलकापूर बाजारपेठ जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याबरोबरच बँकेतील कामासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
लॉक डाऊन काळात तुरळक प्रमाणात दिसणारी वाहनेही मोठ्या संख्येने आल्याने काही वेळ ट्राफिक जाम झाले होते. मलकापूर नगरपरिषद प्रशासनाने अखेर रस्त्यावर उतरून गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर तहसीलदार गुरु बिराजदार यांनी ही भेट दिली. ही वाढती गर्दी प्रशासनासाठी त्रासदायक ठरू लागली आहे
प्रातांधिकारी बी. आर. माळी यांनी कंटेन्मेंट झोनमधील उचतसह सोळा गावचा कंटेनमेंट झोन उठवल्या नंतर आँरेज झोनला शासने दिलेल्या आदेशानुसार सर्व सुविधा देण्याबाबत मलकापूर नगर परिषदेत व्यापारी व प्रशासन यांची बैठक झाली. त्यात मध्ये नऊ ते चार या वेळेत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिल्यानुसार आज मलकापूर शहरातील सर्व व्यवहार,बँका सुरू झाल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत सर्वत्र गर्दीच-गर्दी झाली होती. शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांनी दुकाना समोर रांगाच रांगा लावल्या होत्या.यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाला होता.
दरम्यान शहरात गर्दी वाढल्याचे दिसताच तहसीलदार गुरु बिराजदार यांनी ही भेट दिली तर मुख्याधिकारी शीला पाटील, नगरसेवक प्रवीण प्रभावळकर, अशोक देशमाने, सुहास पाटील व पालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करून गर्दी कमी करण्याची सूचना दिल्या. तर, नागरिकांनी गर्दी न करता कोरोना रोखण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावं असं आवाहनही मलकापूर नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.