वार्ताहर / आष्टा
बागणीत बेकायदेशीरपणे दारुची चोरटी विक्री करणाऱ्या एकावर आष्टा पोलिसांनी कारवाई केली. आष्टा वडगांव रोडवरील एच पी पेट्रोल पंपा समोर बेकायदेशीर दारु विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत संशयित आरोपी अलझार युनुस चौगुले (वय ३२) रा. काकाचीवाडी याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून देशी आणि विदेशी बनावटीचा मद्यासह ३० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लॉकडाऊन काळात विनापरवाना दारू विक्री विरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. परिसरात अमली पदार्थाची अवैध विक्री सुरू असल्यास याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक भानुदास निंभोर यांनी केले आहे.








