उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सृष्टीचे चक्र आहे. अनादी काळापासून ह्याच नियमाने सृष्टीचे चक्र सातत्याने सुरू आहे. मुळात संपूर्ण विश्वाची निर्मिती ही एका बिंदूतून झाली आहे. पुढे पुढे त्यात अनेक बदल घडत गेले आणि आजपर्यंतच्या जीवसृष्टीचा प्रवास झाला. आधी विसंगती आणि मग सुसंगती अशीच रचना सर्वत्र दिसून येते म्हणूनच व्यवस्थापनशास्त्रसुद्धा सतत विसंगती आणि सुसंगती ह्या चक्रात फिरत असते.
व्यवस्थापनशास्त्रात पण उत्पत्ती आहे. मग स्थिती आहे आणि नंतर लय आहे. व्यवस्थापनशास्त्रात लय म्हणजे विनाश नाही तर परिवर्तन होय! जे परिवर्तन नित्य-नूतन आहे. कारण, व्यवस्थापनात सतत नवीन निर्मिती होत असते आणि त्याकरिता जे लय पावले आहे त्यांचे परिवर्तन होणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी ढिसाळ नियोजनामुळे, अयोग्य कार्यपद्धतीचा अवलंब केल्याने व्यवस्थापनाचा लय होईल असे नाही. तर कधी कधी उत्तम व्यवस्थापन हे सर्वोत्तम व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने पण लय पावू शकते किंवा त्यात परिवर्तन घडू शकते. परिवर्तन घडते असे नाही तर परिवर्तनसुद्धा घडवावे लागते. व्यवस्थापन शास्त्रात क्रिया, कर्म आणि कर्ता ह्यांच्यामुळेच बदल शक्मय होतो.
योग्य क्रिया, उचित कर्म आणि उत्तम कर्ता हेच सर्वोत्तम व्यवस्थापन निर्माण करू शकतात. ज्या संस्थेला स्वतःचे ध्येय अल्पावधीत गाठायचे आहे त्या संस्थेतील नेतृत्वाने आपल्या संस्थेतील कर्मचाऱयांची सामूहिक परीक्षा घ्यावी. कर्मचाऱयांची बढती झाल्यानंतर त्यांना ज्याप्रकारचे काम करावे लागेल, त्याप्रकारच्या कामाशी सादृश्यता असलेला प्रकल्प त्यांना द्यावा. कर्मचाऱयांमध्ये योजना आखण्याची क्षमता आहे का, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे का? संघटन करण्याची क्षमता आहे का, इतरांकडून काम करवून घेण्याची क्षमता आहे का ह्याचा शोध घ्यावा. अशा कर्मचाऱयांशी कायम संवाद साधत रहावा. त्यामुळे त्यांच्यातील एखाद्या विषयावर व्यवस्थित विचार करण्याची क्षमता किंवा संदेश वहनाची क्षमता आहे किंवा नाही ह्याची जाणीव उच्चपदस्थ अधिकाऱयांना होते. पर्यवेक्षक, विपेते किंवा कनि÷ व्यवस्थापकांच्या बाबतीत असे निरीक्षण करण्यास कमी कालावधी लागू शकतो. पण वरि÷ व्यवस्थापकांच्या बाबतीत मात्र दीर्घ कालावधी लागतो.
समर्थांनी संस्थेचा, उद्योगसमूहाचा नेता किंवा नेतृत्व कसे असावे ह्याविषयी दासबोधात सांगितले आहे ते असे,
विचारेविण बोलू नये !
विवंचेनेवीण चालों नये !
मर्यादेविण हालो नये !
कांही येक !!
जनी आर्जव तोडू नये !
पापद्रव्य जोडू नये !
पुण्यमार्ग सोडू नये !
कदाकाळी !! 02/02/04-06
म्हणजे विचार केल्याशिवाय बोलू नये, सर्व बाजू ध्यानात घेतल्यावाचून काम सुरू करू नये, नीतीधर्माच्या मर्यादांचे पालन केल्यावाचून हालचाल करू नये. लोकांशी सरळपणाने वागणे सोडू नये, पापमार्गाने द्रव्यसंचय करू नये, नीतीधर्माचा मार्ग कधी सोडू नये. असा उत्तम गुणांचा अवलंब केलेला नेता असेल किंवा नेतृत्व असेल तर त्या संस्थेला कधीही वाईट काळ पहावा लागणार नाही. व्यवस्थापनशास्त्रात नेता किंवा नेतृत्व ह्यांच्या वक्तृत्वावर आणि कर्तृत्वावर संबंधित संस्थेच्या भविष्याची वाटचाल ठरत असते. कारण उत्तम संवादकौशल्य असल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही हा शाश्वत नियम असल्यामुळे पुढे समर्थ म्हणतात की,
अतिक्रोध करू नये !
जीवलगास खेदु नये !
मनी वीट मानू नये !
सिकवणेचा !! 02/02/10
म्हणजे अतिक्रोध किंवा प्रचंड प्रमाणात रागावू नये, स्वकियांना, जीवलगांना दुखवू नये, इतरांकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये.
ज्यांना नेतृत्व करायचे आहे त्यांनी स्वतःच्या रागावर, रागीट वृत्तीवर नेहमी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी होण्यापासून बचाव होऊ शकतो तसेच व्यवस्थापनात उच्चपदस्थ अधिकाऱयांनी इतरांना दुखवू नये. त्यामुळे सुद्धा संस्थेचे अहित होत नाही. प्रत्येकात काहीतरी चांगले गुण असतात त्यांचा अंगिकार, स्वीकार केल्याने किंवा ते गुण शिकल्याने संस्थेची भरभराट होऊ शकते. हे समर्थांनी सांगितलेले उत्तम गुण सर्वोत्तम व्यवस्थापनाकरिता खूप उपयोगाचे आहेत.
जसजसे व्यवस्थापनशास्त्र उन्नत होत गेले तसतसे त्यात नवीन संकल्पना आणि संज्ञांचा समावेश होत गेला. ह्या नवीन संकल्पनांमुळेच व्यवस्थापनात उत्क्रांती होत गेली. उद्दिष्टनि÷ व्यवस्थापन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह मॅनेजमेंट ह्या संकल्पनेमुळे महत्त्वाची भर व्यवस्थापनशास्त्रात पडली. उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी जे प्रमाण ठरविण्यात येते त्यात व्यवस्थापकांना कर्मचाऱयांकडून अपेक्षित काम करवून घेत असताना व्यवस्थापन हा विचार वेगळय़ा स्वरूपात एकतंत्र म्हणून विकसित करणे म्हणजेच उद्दिष्टनि÷ व्यवस्थापन होय!
ध्येयनि÷ आणि तत्त्वनि÷ लोकांची जीवनाची दिशा ठरलेली असते. त्यांचा प्रवासक्रम, किंवा प्रवासाचे टप्पे ठरलेले असतात. निर्धाराने हे लोक मार्गक्रमण करत त्यांचे उद्दिष्ट साध्य करून घेतात. ध्येयनि÷ व्यक्तीला कोणाच्याही प्रोत्साहनाची किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता नसते. अशा व्यक्ती स्वतःच्या हालचाली स्वतःच नियंत्रित करतात. ज्या उद्योग समूहाचे उद्दिष्ट निश्चित असते आणि हे उद्दिष्ट गाठण्यासाठी असे उद्योगसमूह त्यांच्या सर्व क्रिया आणि हालचाली पूर्वनिर्धारित करतात. प्रत्येक उद्योगसमूहातील अनेक उपक्रमात काही व्यक्ती एकत्रितपणे काम करत असतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करीतच असते. परंतु, ह्या सर्व व्यक्तींचे अंतिम उद्दिष्ट सारखे असायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता या सर्व व्यक्तींचे प्रयत्न एकाच मार्गाने असायला हवेत.
समर्थ रामदास स्वामी हे अशाच प्रयत्नवादाचे आणि ध्येयनि÷ तसेच तत्त्वनि÷sचे पुरस्कर्ते होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आयुष्यात जे अनुभवले तेच ठामपणे श्रीमत् दासबोध ग्रंथात मांडले. त्यांनी आपल्या देशात अनेक मठ, अनेक मठपती आणि समर्थ संप्रदाय निर्माण केला तो उत्तमातील सर्वोत्तम व्यवस्थापनाचा मार्ग अवलंबिल्यामुळेच! त्यामुळेच पुढील अनंत काळापर्यंत समर्थांचा व्यवस्थापनाविषयीचा विचार टिकणारा आहे.
माधव किल्लेदार








