वाकरे / प्रतिनिधी
दुचाकी झाडावर आदळून शुक्रवारी रात्री अपघातात गंभीर जखमी झालेल्या हणमंतवाडी (ता.करवीर) येथील संदीप लक्ष्मण झांजगे (वय ३५) या तरुणाचा शनिवारी रात्री उशिरा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की संदीप झांजगे शुक्रवारी रात्री पावणे आठच्या सुमारास नागदेववाडी पाणंदजवळील चौगले मळ्याकडे कांही कामानिमित्त जात होते. एका वळणावर त्यांची दुचाकी घसरून नियंत्रण सुटल्याने एका झाडाला जाऊन धडकली. या अपघातात संदीप गंभीर जखमी झाले होते. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
संदीप यांचे अवघ्या एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते.त्यांचा संसार फुलण्यापूर्वीच नियतीने त्यांच्यावर घाला घातल्याने त्यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. संदीपचे वडील पाटबंधारे खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पॅरॅलीसिस झाल्याने ते अंथरुणावर खिळून आहेत.संदीप स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हिंग आणि प्लम्बिंगची कामे करून उदरनिर्वाह करीत होता.त्याच्या निधनाने कुटुंबाचा आधार गेला.
Previous Articleशेतकर्यांना मिळणार बांधावर खते
Next Article शिराळ्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडात जोरदार पाऊस








