गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत गेल्या 40 दिवसांपासून बंद आहे. मंगळवारपासून ही औद्योगिक वसाहत थोड्या प्रमाणात चालू झालेली आहे. आज रविवारी सकाळी अचानक गवा दिसल्याने याठिकाणी ड्युटीवर असलेल्या वॉचमनला आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय याठिकाणी थोड्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले. यानंतर हा गावा गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील भारत डेअरी समोरून येऊन गोकुळ शिरगाव येथील असलेल्या ओढ्याच्या मार्गाने हा गवा कागले मावाडी शेजारी असलेल्या ओढ्यातून श्रीकृष्ण मंदिराकडे गेला . दरम्यान श्रीकृष्ण मंदिराशेजारील असलेले शेतकरी भुजंगा पाटील यांना आज हा गवा अकराच्या सुमारास आपल्या शेतात गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बातमी गोकुळ शिरगाव येथील सरपंच एम. के. पाटील यांना कळवली. सरपंच पाटील यांनी वनाधिकारी व गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याला या घटनेची माहिती दिल्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिस वनअधिकारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








