प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे रत्नागिरीत अडकडून पडलेल्या तामिळनाडूतील कामगार व विद्यार्थ्याच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता व हातातील पैसाही संपत आल्याने आपल्या राज्यात पाठवावे या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी शनिवारी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. मात्र पोलीसांनी त्यांची समजूत काढत त्यांना माघारी पाठवले.
लॉकडाऊनमुळे सध्या रत्नागिरी शहर व एमआयडीसी परिसरात तामिळनाडूमधील जवळपास 450 कामगार आणि विद्यार्थी अडकलेत. एका एग्रीकल्चर कंपनीसाठी सेल्समन म्हणून ते कार्यरत आहेत. या कंपनीतच त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे काम नसल्याने हातात पैसा नाही. दीड महिना हे कामगार व विद्यार्थी एमआयडीसी परिसरात असून अपुऱया सुविधा, व अन्न-पाण्यापासून हाल होत असल्यो त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी सोडा या मागणीसाठी शनिवारी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. समस्यांचा पाढा जिल्हाधिकाऱयांसमोर वाचण्यासाठी साळवी स्टॉप येथून त्यांनी मोर्चा आढला.
मात्र मोर्चाची माहिती मिळताच पोलिसांची मोठी फौज साळवीस्टॉपच्या दिशेने रवाना झाली. तोपर्यंत हा मोर्चा मुख्य मार्गाने शिवाजीनगरपर्यंत आला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना शिवाजीनगर येथे पोलिसांनी रोखला. पोलीसांनी त्यांची काढत ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी परत पाठवले.
परवानगी मिळताच परत पाठवणार-डीवायएसपी इंगळे
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढली. तसेच यावर काहीतरी तोडगा काढू असं आश्वासित केले आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या राज्याची परवानगी मिळाली, की या सर्वांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.









