प्रतिनिधी/कोल्हापूर,
लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून परिणामी नोकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत. त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. या संदर्भातील वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी विभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील 12 आगारामध्ये वाहतुक नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्यांचे दूरध्वनी क्रमांक असे कोल्हापूर आगार -0231-2652185 (9975106909), संभाजीनगर- 0231-2622416 (8855860709), इचलकरंजी- 0230-2432202 (9921689244), गडहिंग्लज-02327-222264 (7709693340), गारगोटी- 02324-220022 (9921295611), मलाकापूर-02329-224131 (9404047128), चंदगड- 02320-224124 (9423825139), कुरूंदवाड -02322-244237 (9730947844), कागल- 02325-244064 (9623401419), राधानगरी -02321-234024 (9421114603), गगनबावडा -02326-222011 (9518333238) आणि आजरा आगार – 02323-246140 (8698524068)