सेन्सेक्समध्ये 232 अंकांनी वाढ : दिवसभर चढउताराचे सत्र
प्रतिनिधी / मुंबई
कोरोनाच्या काळजीने लॉकडाऊनचा कालावधी आणखीन तिसऱया सत्रात वाढविण्यात आला आहे. यामुळे एका बाजूला आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या संरक्षणासाठी मोठय़ा प्रमाणात लढावे लागत आहे. सरकार आपल्या पातळीवर योग्य त्या ठिकाणी सवलती देण्याचा प्रयत्न करुन काही क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान शेअर बाजारातही काहीसे दबावाचे वातावरण मागील काही दिवसांपासून सुरु आहे. चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशीच्या सत्रात बुधवारी मात्र दिवसभरातील दबावाच्या व्यवहारात बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीमुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स 232 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,685.75 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 65.30 अंकांची तेजी नोंदवत निर्देशांक 9,270.90 वर बंद झाला आहे. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने 800 अंकांच्या चढउताराचा प्रवास करत आपला प्रवास थांबविला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग पाच टक्क्मयांनी वधारले आहेत. सोबत बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि हिरो मोटोकॉर्प यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला आयटीसीचे समभाग मात्र 5 टक्क्मयांपेक्षा अधिकने घसरत बंद झाले आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस, टायटन आणि इन्फोसिसचे समभागही नुकसानीसह बंद झाले आहेत.
कोरोनाधास्ती कायम
कोरोना विषाणूच्या विळख्याने आणि आर्थिक अनिश्चतता वाढल्याने कंपन्यांचे तिमाही नफ्याचे आकडे घसरलेत तर काहींचे आकडे नफ्यात राहिल्याने या अनिश्चितीततेची भीती व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. हीच स्थिती जागतिक पातळीवरही असल्याने सर्वानी एकत्र येत कोविड 19 च्या संकटाला टक्कर देण्याची गरज असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









