प्रतिनिधी/ मेढा
कोरोनाच्या महामारीची टांगती तलवार जावली करांचे डोक्यावर असतानाच तीव्र उन्हाळ्यामुळे तालुक्यात 39 गांवात तीव्र पाणी टंचाईचे संकट उभे राहीले आहे. दरम्यान तीव्र पाणी टंचाई असणाया व टॅंकरची मागणी केलेल्या मोरघर,धनगरपेडा या दोन गांवांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला असल्याची माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुध्दे यांनी दिली आहे.
तीव्र उन्हाळ्याच्या झळा जावली तालुक्यात जाणवू लागल्यामुळे पाणवठयाच्या विहीरी , कुपनलीका यांचे झरे आटू लागल्याने , कोरोना बरोबरच पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच ओढे , नाले व नदीची पात्रे केव्हाचं कोरडी पडल्यामुळे जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही गांवातील नागरीकांना विशेषता महिलांना तर एक ते दोन किंमी पायपिट करून पाणी आणावे लागते. मात्र सध्या कोरोनामुळे घरातुन बाहेर पडता येत नसल्यामुळे पाण्यावाचून घशाला कोरड पडू लागली आहे. जावली तालुका पाणी टंचाई आढावा बैठक वास्तविक मार्च महिन्यामध्ये होते .टंचाईग्रस्त गांवाचा आरखडा तयार करून त्याप्रमाणे उपाययोजना करून तीव्र टंचाई भासणाया गांवांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. कोरोना मुळे चालू वर्षी ही बैठक पदाधिकारी, व अधिकायांना वेळेत घेता न आल्यामुळे पाणी टंचाईचे नियोजन करता आले नाही.
दरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ’ यांनी काही दिवसांपूर्वी अधिकायांची तातडीची बैठक घेवून , जिथे पाणीटंचाई जास्त जाणवते तिथे प्रस्तावाची वाट न बघता शासकीय टँकर चालू करा .पण लोकांना तहानलेले ठेवू नका अशा सुचना त्यांनी संबधीत आधिकायांना दिल्या .
कोरोनाचा महाभयंकर रोग जिह्यात हळू हळू पाय रोवून बसला असताना पाण्याचे दुर्भिक्ष जसा उन्हाळा वाढतोय तसे जावलीत जाणवू लागले आहे.याच पाश्र्वभूमीवर सातारा -जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावली पंचायत समितीच्या कार्यालयात बोलवून पाणी टंचाईबाबत आढावा घेऊन याबाबत सुचना केल्या.
आ.भोसले म्हणाले,जावली तालुक्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक प्रत्येकाची घरी बसून काळजी घेत आहेत. दरवर्षी आपण मार्च अखेरीस पाणीटंचाई आढावा बैठक घेऊन ज्या गावात पाणीटंचाई आहे अशा गावांचे प्रस्ताव तयार करून लगेच त्या गावांना पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून देतो परंतू या वर्षी खुप उशिर झाला असून 22 मार्चपासूनच कोरोनाने संपुर्ण देश व्यापल्याने यावर्षी बैठक घेता आली नाही. तरी सुध्दा प्रत्येक गावच्या सरपंच व ग्रामसेवकांपासून पाणी टंचाईचा आढावा घेवून ज्या गावांना पाणी टंचाई जास्त भासवू लागली आहे अशा गावांचे तात्काळ प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवावेत मी स्वतः लक्ष घालून जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांचेशी बोलून पाणीटंचाईवर मात करू असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यांनी केले आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या भितीने मुबंई व पुण्याहून नोकरीनिमित्त असणारे चाकरमानी हे सर्व गावाला आल्याने दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पाण्याचा वापर जास्त होत आहे. बामणोली विभागात सावरी, आपटी, पावशेवाडी, या विभागातही पाण्याची टंचाई जास्त जाणवते तसेच केळघर विभागातही ब्रयाच गावांचा आढावा घेवून त्यांचीही सविस्तर माहिती घेवून प्रस्ताव तयार करून तात्काळ पाठवावेत असेही आवाहन आ. भोसले यांनी केले आहे.








