तळागाळातील महिलांना सातत्याने मदत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना व्हायरसमुळे जगभरात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून बेळगाव शहरात सुध्दा अनेकजण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. बेळगाव मधील प्रशासनासोबतच अनेक सामाजिक संघटना यावेळी गरीब गरजूंच्या साहाय्यासाठी धडपडत आहेत,गेल्या तिन वर्षांपासून महिलांसाठी कार्यरत असणारी जायंट्स सखी ही संघटना सुध्दा मदत कार्यात आघाडीवर आहेत.
गे ल्या आठवड्यात जायंट्स सखी या महिला संघटनेच्या वतीने अगसगा येथील खडीमशिन वरील लमानी कुटुंबाना रेशन आणि भाजीपाला वितरित करण्यात आला होता त्यानंतर कंग्राळ गल्ली येथील रोज धुणीभांडी,मोलमजुरी आणि फळविक्री करून जिवन व्यतीत करणाऱ्या एकूण चाळीस कुटुंबाची माहिती नियोजित उपाध्यक्षा विद्या सरनोबत यांना मिळाली लागलीच त्यांनी पदाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली आणि या सगळ्या कुटुंबाना तांदूळ,डाळ,साखर, चहापावडर,तेल,कांदे,बटाटे असे सामान वितरित केले. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना एकवेळचे भोजन देण्यात आले.या दोन्ही ठिकाणी विद्या सरनोबत आणि अर्चना पाटील यांनी अर्थसहाय्य केले.यावेळी अध्यक्षा नम्रता महागावकर, माजी अध्यक्ष ज्योती अनगोळकर,उपाध्यक्ष निता पाटील,शीतल पाटील,विद्या सरनोबत, अर्चना पाटील, ज्योती सांगूकर व इतर जायंट्स सखीच्या सदस्या उपस्थित होत्या.









