वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्कस बँक्स, गुप्तहेर एझेकिल झेक बँक्स आणि त्याचा सहकारी विल्यम शेंक काही हत्या प्रकरणांचा तपास करत असताना त्यांना शहराचा वेगळाच भूतकाळ आणि त्यातील रहस्य समजतात. ही रहस्यं उलगडत असतानाच एझेकिल या हत्या प्रकरणांच्या मुख्य सूत्रधाराच्या जाळात अडकतो. तो त्यातून कसा बाहेर पडतो याची कहाणी द स्पायरल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. क्रिस रॉक, सॅम्युअल जॅक्सन, मॅक्स मिंगेला, मॅरिसोल निकोलस आणि झोई पाल्मर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. डॅरेन बॉसमन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून जोश स्टोलबर्ग आणि पीटर गोल्डफिंगर यांची पटकथा आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई









