प्रतिनिधी / मडगाव
काणकोणपासून पेडणेपर्यंत गोव्यात मच्छीमारीच्या व्यवसायात गुंतलेल्या सुमारे आठ हजार मच्छीमारांना आत्ता आपल्या मूळ गावी जाण्याचे वेध लागले आहेत. यंदा मच्छीमार हंगाम त्यामुळे किमान दहा-पंधरा दिवस अगोदरच संपुष्टात येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. वास्तविक हे मच्छीमार जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात परतीचा मार्ग धरायचे.
सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून ग्रीन झोनमध्ये नोंदणी झालेल्या राज्यांना तसेच जिल्हय़ांना जवळपास सर्व व्यवहार सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात गोव्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. मच्छीमारी व्यवसाय देखील ठप्प झाला होता. त्यात आत्ता विविध राज्यात अडकलेल्या मजूरवर्गाला आपल्या राज्यात जाण्याची मूभा देण्यात आली आहे. त्यात मच्छीमारांचा देखील समावेश आहे.
सध्या गोव्यातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सरकार दरबारी नोंदणी करण्यासाठी मजूरांची गर्दी होऊ लागली आहे. गोव्यातील मच्छीमार देखील आपली नोंदणी करू लागले आहेत. गोव्यात सुमारे 8 हजार मच्छीमार असून ते काणकोण पासून पेडणे पर्यंत ट्रॉलर तसेच छोटय़ा मोटर बोटच्या माध्यमांतून मच्छीमारी करतात. त्यांच्या परतीच्या प्रवासाची प्रक्रिया पूर्ण होण्यास दहा-पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास मे महिन्याच्या अखेरपर्यंत ते परत आपल्या गावी पोचलीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदाचा मासेमारी हंगाम मच्छीमार परत गावी जात असल्याने किंचित लवकर संपणार असल्याचे संकेत मिळत आहे. जून महिन्यात गोव्यात मासेमारी बंदी जाहीर केली जाते.
खलाशांना घेऊन येणारी जहाजे भारताच्या वाटेवर
सुमारे 3500 भारतीय खलाशांना घेऊन येत असलेली तीन जहाजे भारताच्या वाटेवर आहेत. या तीन जहाजात सुमारे 1200 गोमंतकीय खलाशी आहेत. ही जहाजे 10 ते 15 मेच्या दरम्यान भारतात पोहोचणार असून ती मुंबई व मुरगांव बंदरात खलाशांना उतरविणार आहे. त्यासाठी त्यांनी परवानगी मागितली आहे.
रॉयल कॅरीबियन्स ओवेशन आणि कार्निवल युरोपा या दोन जहाजांनी मुरगाव बंदरावर गोव्यातील खलाशांना उतरविण्यासाठी अनिवासी भारतीय कार्यालयाशी संपर्क साधला आहे. हीच जहाजे कोची-केरळ व मुंबई बंदरावरही भारतीय खलाशांना उतरविणार आहेत. तिसरे जहाज नॉर्वेचे सेवन सिज वोयाजर हे पुढील आठवडय़ात मुंबईत पोहोचणार असून त्यात 160 भारतीय खलाशी आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









