ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जगावर कोरोनाचे भीषण संकट असतानाही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरच्या रामपूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी गोळीबार केला. या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले असून, दोन जण जखमी झाले आहेत.
गोकर्ण सिंह आणि नायक शंकर एस.पी. अशी शहीद जवानांची नावे आहेत. तर नायक प्रदीप भट्ट आणि हवालदार नारायण सिंह अशी जखमी जवानांची नावे असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाक सैन्याने शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर विभागातशस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.









