ऍपल ऍपवर माहिती

दिग्गज तंत्रज्ञान कंपनी ऍपलने स्वतःच्या मॅपमध्ये तपासणी केंद्रांची माहिती जोडली आहे. ऍपल मॅपवर अमेरिकेच्या सर्व 50 प्रांतांची आणि प्यूटो रिकोमधील चाचणी केंद्र, रुग्णालय, आपत्कालीन सेवा आणि औषध दुकानांची माहिती उपलब्ध आहे. ऍपलचे ग्राहक डेडिकेटेड कोविड टेस्टिंग साइट्सची माहिती प्राप्त करू शकतील
दहशतवाद्यांपेक्षा धोकादायक

कोरोना विषाणू हा एखाद्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे. हा विषाणू जगात उलथापालथ घडवून आणू शकत नसल्याने सर्व देशांनी एकजूट होऊन त्याचा मुकाबला करावा. या विषाणूला पराभूत करण्यासाठी इतिहासाच्या कुठल्याही क्षणापेक्षा अधिक सद्यक्षणी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
ााrनवर ट्रम्प यांचा नवा आरोप

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणाऱया अध्यक्षीय निवडणुकीत आपण विजयी होऊ नये यासाठी चीन प्रयत्नशील असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मला रोखण्यासाठी चीन काहीही करू शकतो. डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन हे अध्यक्षीय निवडणुकीत विजयी व्हावेत अशी चीनची इच्छा असल्याचे ट्रम्प म्हणाले.
रेमडेसिविरची चाचणी यशस्वी

नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ हेल्थच्या प्रारंभिक चाचणीत रेमडेसिविर औषधाचा सकारात्मक निष्कर्ष समोर आला आहे. रेमडेसिविर औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 31 टक्क्यांनी अधिक आहे. या औषधाची चाचणी नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ऍलर्जी अँड इंफेक्शियस डिसिजने (एनआयएआयडी) केली आहे. ही संस्था एनआयएच अंतर्गत काम करते.
अमेरिकेत संकट कायम

अमेरिकेत मागील 24 तासांत 2,502 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 61,669 जणांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 10 लाख 64 हजार 572 रुग्ण सापडले आहेत. न्यूयॉर्कमध्येच 3 लाख रुग्ण सापडले आहेत. न्यूजर्सीत 1 लाखांहून अधिक बाधित सापडले असून 6 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
इटलीत संकट ओसरतेय

इटलीत आतापर्यंत 27 हजार 682 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या 2,03,591 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत इटलीत 323 जणांना जीव गमवावा लागला आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवार मृतांच्या संख्येत घट झाली आहे. देशात 10 मार्च रोजी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला 3 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे.
चीनमध्ये 4 नवे रुग्ण

चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये 4 नवे रुग्ण सापडले असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. देशाच्या 31 प्रांतांमध्ये आतापर्यंत 82 हजार 862 रुग्ण सापडले असून 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे. हाँगकाँगमध्ये 1,037 बाधित असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तैवानमध्ये 429 रुग्ण सापडले असून 6 जणांना जीव गमवावा लागला आहे.
मुलांमध्ये दुर्लभ सिंड्रोम

कोरोना विषाणूमुळे काही मुलांमध्ये दुर्लभ सूज येण्याचा आजार निर्माण होतोय का याची तपासणी केली जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मुलांमध्ये होत असलेल्या या आजाराचे कारण कोरोना असू शकते असा इशारा ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱयांनी दिला आहे. अमेरिका, ब्रिटन, इटली, फ्रान्स, स्पेन आणि स्वीत्झर्लंडमध्ये याचे सुमारे 100 रुग्ण सापडले आहेत.









