वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
प्रसिद्ध कार निर्मिती कंपनी होंडा कार्स लवकरच आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाईन वाहन खरेदी करण्याची प्रक्रीया सुरु करण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना ऑनलाइन कार्सचा पर्याय पाहून त्याप्रमाणे आवडीची गाडी बुक करता येणार आहे. यात ग्राहकांना जवळचा विक्रेता, आपली कार आणि अन्य गोष्टींची माहिती उपलब्ध असेल.
कंपनीच्या संकेतस्थळावर आपल्याला हवी असणारी माहिती उपलब्ध होणार आहे. यात ग्राहकाला आपली माहिती देण्यासाठी युजर आयडी व अन्य पर्यायाची निवड करावी लागणार आहे. या प्रकारचे डिझाईन डिजिटल स्वरुपात करण्यात आले असल्याने देशभरातील डिलरची माहिती एकत्रित केल्याचे स्पष्ट केले आहे.
निवड ऑनलाईनच
ग्राहकांना आपल्याला हवी असणारी गाडी तिचा रंग, मॉडेल, इंजिन क्षमता आणि अन्य सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन मार्ग उपलब्ध होणार आहे तर विमा सुरक्षा व अन्य कागदपत्रंाची पुर्तताही याचप्रकारे करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.