नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट मंडळाचे कायदेशीर सल्लागार तसेच माजी न्यायाधीश डी.के. जैन यांच्या करार वाढीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. बीसीसीआयचे एथिक्स अधिकारी डीके जैन यांच्याबरोबर बीसीसीआयने एक वर्षांसाठी केलेल्या कराराची मुदत गेल्या फेब्रुवारीमध्ये संपुष्टात आली आहे. मात्र त्यांच्या मुदतीमध्ये अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांच्याकडे जैन यांच्या करारात मुदतवाढ देण्याचे अधिकार आहेत.









