नाशिक : प्रतिनिधी
मालेगावा जिल्हा रुग्णालयाला ३६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले. ते सर्व रिपोर्ट मालेगावातील व्यक्तींचे आहेत. त्यामुळे आता एकट्या मालेगावातील करोनाबाधितांची संख्या १५९ असून, जिल्ह्यात एकूण १८१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सोमवारी मालेगावातील ४३९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. मात्र ३६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग हादरून गेला आहे. ३६ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २२ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे. यामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसऱ्यादा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.








