शिराळा / प्रतिनिधी
निगडी (ता.शिराळा) येथील त्या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्या सहा जणांचे आवाहल निगेटिव्ह आल्याने निगडी ग्रामस्थ व प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
सोमवारी २४ जणांनाच्या पैकी १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तर ६ प्रलंबित होते. ते उर्वरित अहवाल आज मंगळवारी निगेटीव्ह आले आहेत. काळुंद्रेच्या एकाचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे २५ पैकी २४ निगेटिव्ह व १ प्रतीक्षेत आहे. निगडीतून एकूण ४५ जणांचे स्वॅब तपासणी साठी पाठवण्यात आले होते. त्या पैकी दोन पॉझिटिव्ह आले असून ४३ जण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्यातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.








