उत्पन्न कमी झाल्याने प्रशासनाचे काटकसरीचे धोरण
विजय थोरात/सोलापूर तरुण भारत संवाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 22 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची सेवा देखील बंद असल्याने महामंडळाच्या तिजोरीत उत्पन्न नसल्याने खडखडाट आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने काटकसरीचे धोरण म्हणून चाळीस टक्के प्रवासी असलेल्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजी झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील बंदला जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे एसटीची राज्यातील सेवा देखील मागील महिन्यापासून बंद आहे. महामंडळाचे एसटीचे दररोजचे प्रवासी उत्पन्न सुमारे 21 ते 22 कोटींचे बुडत आहे. त्यामुळे महिन्याभरापासून जवळपास 861 कोटी रुपयांचे एसटीचे नुकसान झाले आहे. आधीच तोट्यात असलेली एसटी मागील महिन्याभरापासून बंद असल्याने यामध्ये आणखीन वाढ झाली आहे. एसटीचे उत्पन्न भरून काढणे शक्य नसल्याने एसटीतील अधिकाऱ्यांना काटकसरीचे धोरण राबविण्याचे आदेश महामंडळाकडून देण्यात आले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्या मध्ये 40 टक्केच प्रवासी असल्यास या फेऱ्या बंद होणार आहेत. त्यामुळे सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
एखाद्या मार्गावर एसटी जाणे आणि येणे अशा दोन्ही बाजूंच्या प्रवाशांची बेरीज जवळपास 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसल्यास अशा मार्गावरील फेर्या बंद करण्यात येणार आहेत.
रातराणीवर चालक-कम-वाहक
रात्रीच्या वेळी लांब पडल्यावर धावणाऱ्या रातराणी बसमध्ये फारच कमी प्रवाशांची चढ-उतार होते. त्यामुळे रातराणी बसवरील वाहकांना फारसे काम नसते. अशा बसमध्ये चालक कम वाहकांची नियुक्ती करून एक वाहकाची बचत करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे मागील एक महिन्यापासून राज्यातील एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे दररोजचे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर40 टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या मार्गावर एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. – राहुल तोरो, वाहतूक महाव्यवस्थापक, मुंबई
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









