ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम असून, ते 13 एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा खुलासा उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी केला आहे. त्यामुळे जोंग यांच्या मृत्यूच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आले होते. उत्तर कोरियाने या अफवेचे खंडन केले आहे. किम जोंग जिवंत असून, त्यांची प्रकृत्ती उत्तम आहे. ते 13 एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत, असे मून चंग इन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
जोंग यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही सांगितले जात होते. पंधरा एप्रिलला जोंग यांच्या आजोबांची जयंती होती. या जयंतीला किम जोंग उपस्थित नव्हते. त्यानंतर जोंग यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आले होते. उत्तर कोरियाने याबाबत खुलासा केल्यानंतर जोंग यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.









