प्रतिनिधी / शिराळा शिराळा तालुक्यातील शिरसी येथे शिरसी धामवडे रस्त्यावर भोसले मळा येथे बाळू बाबू घाटके (वय 62) या इसमाचा खून करण्यात आला. शंकर नाना तटले (वय 50) याने पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून बाळू घाटके याचा कुऱहाडीने वार करून खून केला. संबंधित घटनेची फिर्याद राज प्रकाश घाटके यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. शनिवार, 25 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील भोसले मळा येथे खुनाची घटना घडली. संबंधित खून प्रकरण घटनेची फिर्याद शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शिराळा पोलीस ठाणे व घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी की, मयत बाबू घाटके हे देवरूषी होते. ते गावातील लोकांचे नशीब हातावरच्या रेषा पाहून सांगत होते. त्याच्या अंगी देवपण असल्याने त्यानी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी खऱया ठरत असल्याचे या परिसरात प्रसिद्धीस आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे देवपण बघण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक तसेच महिला येत होत्या. संशयित आरोपी शंकर नाना तटले याची पत्नी बाळू घाटके यांच्याकडे देवऋषी पणासाठी जात होती. तिचे बाळू घाटके यांचेकडे अनेक कालावधीपासून जाणे-येणे होते. या कारणावरून आरोपी व त्याची पत्नी यांचे मध्ये अनेक वेळा वादविवादही घडले होते. या दरम्यानच्या काळात संशयित आरोपी शंकर तटले याला पत्नी व मयत बाळू घाटके यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. या संशयावरून त्याचे पत्नीशी अनेक वेळा वादही घडले होते. दोघातील भांडणांच्या मुळे सध्या पत्नी बाहेर गावी गेली आहे. त्यामुळे संशयित आरोपी हा घरी एकटाच राहत होता. असेच वाद आरोपी व मयत यांच्या दरम्यानही अनेक वेळा घडले होते. हा चारित्र्याच्या संशयाचा प्रकोप शनिवारी घडून आला. मयत बाळू घाटके हे दळपासाठी चालले होते. तर आरोपी शंकर तटले हा शेळ्या-मेंढय़ा चारावयासाठी घेऊन निघाला होता. दोघांची भेट शिरसी येथील भोसले मळा येथे घडून आली. या दोघात यावेळी बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. संशयित आरोपी शंकर तटले याच्या हातात कुऱडाड होती. शंकर तटले याने बाळू घाटके यांच्यावर कुऱहाडीने वार केले. डोक्याच्या मध्यभागी, मानेच्या दोन्ही बाजूला व हातावरती कुऱहाडीचे घाव बसले आहेत. कुऱहाडीचे अनेक वर्मी घाव लागल्याने बाळू घाटके जाग्यावरच मयत झाले. या खून खटल्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे करीत आहेत. संशयित आरोपीचे पलायन दरम्यानच्या काळात आरोपी शंकर तटले याने बाळू घाटके याच्यावरती सपासप कुऱहाडीचे वार करून बाळू घाटके निपचीत जागेवरती पडल्यानंतर आरोपी तेथूनच पसार झाला आहे. शिराळा पोलीस यांच्याकडून गतीने तपास सुरू आहे रागातून कृत्य चारित्र्य संबंधीच्या घटना व शेतजमिनीच्या वादविवादाच्या घटनावरून अनेक खून खटले घडले आहेत. शंकर तटले याच्या डोक्यात चारित्र्याच्या संशयाचा राग ठाण मांडून बसलेला होता. शंकर तटले याने बाळू घाटके यांच्यावरती इतके कुऱहाडीचे वर्मी घाव घातले की, बाळू घाटके जागेवरच गतप्राण झाले. यावरूनच शंकर तटले याच्या डोक्यात ठाण मांडून बसलेल्या रागाची तीव्रता स्पष्ट होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








