प्रतिनिधी / पणजी
पालये येथे जनशिक्षण संस्थान, पर्वरीतर्फे सध्या मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षक रंजना न्हांजी यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क तयार करुन बचतगटांना पुरविण्यात येत आहेत. या कामात वनश्री गोजेकर, सरीता नाईक, प्रणाली परब यांनी त्यांना मदत केली.
जनशिक्षण संस्थान, पर्वरीतर्फे त्यांना कापड उपलब्ध करुन देण्यात आले होते. यादरम्यान मांद्रे, मोरजी, हरमल व पालये या भागात या मास्कचे वितरण करण्यात आले. यादरम्यान सरिता नाईक यांनी सुमारे 100 मास्क पालये येथील पंचायत सदस्य प्रशांत नाईक यांना प्रदान केले.
यावेळी पंचायत सदस्य प्रशांत नाईक यांनी सरीता नाईक व या कामात हातभार लावलेल्या सर्वांचे आभार मानले. अशाप्रकारच्या कामाची सध्या समाजाला आवशकता आहे. त्यांच्या या कामाला आमच्या शुभेच्छा असे प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.









