‘मी खेळत असताना कागदावर भारताची फलंदाजी लाईनअप आमच्या संघापेक्षा निश्चितच अधिक भक्कम होती. आमचे प्रदर्शन त्यांच्याइतके सरस नसायचे. पण, सांघिक खेळाच्या निकषावर आम्ही अधिक सरस होतो. कारण, आमच्या एखाद्या खेळाडूने 30 ते 40 धावा केल्या तरी ते आमच्या संघासाठी असायचे तर भारताचे फलंदाज मात्र केवळ शतक झळकावण्याच्या वैयक्तिक हव्यासापोटी खेळायचे’, असा जावईशोध हकने येथे लावला.
सध्या काय बदल झाला आहे, या प्रश्नावर
हक म्हणाला, ‘सध्याच्या आमच्या खेळाडूंना त्यांचे संघातील स्थान कायम राहील की नाही,
याचीच अधिक भीती असते आणि यामुळे ते प्रभावी खेळ साकारण्यासाठीच झटत असतात. पण, या
प्रक्रियेत संघाची नेमकी गरज काय आहे, हे ओळखण्यात ते कमी पडतात. इम्रान कर्णधार असताना
अशी परिस्थिती अजिबात नव्हती. इम्रान कर्णधार या नात्याने त्यांच्या पाठीशी असायचा.
त्यामुळे, खेळाडू गुणवत्तेला न्याय देण्यात यशस्वी होत असत,’ असे इंझमाम म्हणाला.
अर्थात, यासाठी कर्णधार व प्रशिक्षक यांच्यात एकवाक्यता असणे खूप महत्त्वाचे ठरते. ते एकत्रित असतील तर खेळाडूंना सुरक्षितता व विश्वास प्रदान करु शकतात’.









