प्रतिनिधी / पणजी
कोराना विषाणुमुळे सर्वच ठिकाणी बंदी असल्याने घरातून बाहेर पडणाऱया लोकांच्या संख्या कमी झाली आहे. केवळ गरज असल्यासच बाहेर पडावे अशी सूचना सरकारने दिल्याने त्याचे पालन काहीप्रमाणात होताना दिसत आहे. याचा परिणाम बहुतेक व्यावसासांवर झालेला आहे. रायबंदर पाटो रस्त्याजवळच्या पारंपरिक मिठागरात मिठाच्या राशी पडून आहेत. त्यातही अवकाळी पाऊस पाऊस आल्याने हे मीठ जर लवकर विक्रीस गेले नाही तर मोठा फ्ढटका मीठ विक्रेत्यांना बसणार असल्याने ते लवकरात लवकर विक्रिस जाणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या प्रतीक्षेत सद्या मिठ विक्रेते आहेत. त्यामुळे s विक्रेते चिंतेत आहेत.
कोरोना विषाणुमुळे टाळेबंदी असल्याने गोव्यातील मिठाचे वितरण ठप्प झाले आहे. गोव्यात या पारंपरिक गावठी मीठाला जोरदार मागणी असून टाळेबंदी उठण्याची मीठ विपेते वाट पाहात आहेत. सद्या रायबंदर येथील या मीठ विक्रेत्यांनी पोत्यांमध्ये मीठ भरून ठेवले असून प्रत्येक पिशवी 100 रु. दराने विकली जात आहे. विशेष परवानगी घेऊन यावे लागत असल्याने ग्राहकही येणे टाळत असल्याने विपेत्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोव्यात अजूनही पारंपरिक मिठाचा व्यवसायक टिकून ठेवला आहे. दि. 3 मेपर्यंत टाळेबंदी असून मीठ वितरणास व्यावसायिकांची कोंडी होत आहे. गोमंतकीय अजूनही गावठी मीठ वापरत आहेत. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मिठाची जोरदार मागणी होते परंतु यावर्षी सर्वच ठप्प असल्याने मागणीही असूनदेखील ग्राहक येत नाही. दरवषी एप्रिल आणि मे महिन्यात जास्त प्रमाणात गोव्यातील व शेजारच्या भागातील लोकांकडून ग्राहक हे मीठ खरेदी करतात. या गावठी मिठाची गोडी काही वेगळीच असते.
देशात अनेक नामवंत कंपन्या मिठाचे उत्पादन करते मात्र गोव्यातील लोकांची या मिठालाच पसंती असल्याचे दिसून येते. अवकाळी पावसाची मिठागराच्या व्यावसायिकांवर टांगती तलवार आहे यात शंका नाही. अवकाळी पडलेल्या पावसाने या व्यावसायिकांचे तोंडचे पाणी पळविले आहे. पावसापूर्वी मिठाची विक्री होणे आवश्यक आहे.