आगामी तिमाहीवर प्रभाव राहण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड 19 चा देशातील वाढता संसर्ग हा देशातील विविध घटकांवर मोठय़ा कालावधीपर्यंत परिणाम करणारा ठरणार असल्याचे तज्ञांकडून सांगितले जाते. यात सर्वात मोठी चिंता आहे, ती देशातील उद्योग जगताला. आगामी जून तिमाहीनंतही उद्योगांवरील आर्थिक दबाव कायम राहणार असल्याचे उद्योग मंडळ ऍसोचॅम आणि प्राइम पार्टनर्स यांच्या माहितीमधून हे सांगण्यात आले आहे. सदरच्या संशोधनातून गुंतवणूक योजना लांबण्याची किंवा रद्द करण्याचा विचार कंपन्या करु शकतील, तसेच कंपन्यांमधील कर्मचारी कपातीऐवजी त्यांना कायम ठेवून व्यवसायावर भर देण्यावर कंपन्या ठाम आहेत.
लहान, मध्यम आणि मोठय़ा उद्योगांसह यामध्ये उत्पादन, पायाभूत सुविधा आणि सेवा या इतर क्षेत्रांचाही समावेश आहे. प्रत्येक सेगमेंटमधील 3,552 लोकांचा या सर्वेमध्ये समावेश केला आहे. 79 टक्के लोकांनी म्हटले आहे, की कोविड 19 मुळे आर्थिक दबावाचे वातावरण एप्रिल ते जून तिमाहीच्या नंतरही कायम राहणार असल्याचा अंदाज या माहितीमधून दिला आहे. कारण लॉकडाऊनमुळे पुरवठा क्षेत्राची साखळी प्रभावीत होत असल्याचा अंदाज यावेळी नोंदवला आहे.
26 टक्के लोकांची मते
या संपूर्ण सर्वेक्षणातून जवळपास 33 टक्के कंपन्यांमधील वर्किंग कॅपिटल कमी होण्याची चिंता व्यक्त केली आहे. तर 78 टक्के लोकांच्या मते, की एप्रिल ते जून तिमाहीत व्यवसायातील महसूलावर मोठा प्रभाव होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येणाऱया पुढील तिमाहीवर यांचा परिणाम होणार असल्याचे भाकीत आहे. दिलासादायक बाब म्हणजे 36 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.









