ऑनलाईन टीम / रायपुर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यातच एक छत्तीसगड मधील बिजापूर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक बारा वर्षांची चिमुकली आपल्या परिवारासोबत तेलंगणातील पेरूर गावी कामासाठी गेले होते. मात्र, लॉक डाऊन 2 नंतर ही मुलगी आपल्या परिवारासोबत बिजापूर मध्ये येत असताना सतत तीन दिवस पायी चालून तिचा डीहायड्रेशनमुळे तिचा मृत्यू झाला आहे. आणि घरापासून केवळ 14 किलोमीटर दूर असताना या मुलीचा मृत्यू झाला.
जमालो मडकाम असे या मुलीचे नाव आहे. जमलो चे वडील म्हणाले, जमलोला उलटी – जुलाभ झाले तसचे तिच्या पोटातही दुखत होते. या घटनेनंतर सुरक्षितता म्हणून सर्व मजुरांना क्वारंटाईन केले आहे.
बिजापूर येथील डॉक्टरांनी सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही जमालो चा मृतदेह बिजापूर मध्ये आणला. सुरक्षा म्हणून संबधित मुलीचे सँपल कोरोना टेस्ट साठी पाठवण्यात आले, तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गर्मी आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे तिचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच राज्य सरकारने जमालो च्या परिवारास एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.