ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महत्त्वाच्या तारखा, दिनविशेष, अनेक दिग्गज, त्यांचे योगदाना सलाम करण्यासाठी गुगलकडून नेहमीच रंगीबेरंगी डुडल तयार केले जाते. मात्र, सध्या देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संकटाच्या काळात काम करणाऱ्या सर्वांच्या कामाची नोंद घेण्यासाठी गुगल कडून खास डूडल सिरीज लॉन्च करण्यात येत आहे.
या अंतर्गत गुगलकडून आज ‘कोरोना वॉरियर्स’ साठी खास डुडल तयार करण्यात आले आहे. ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणजेच कोरोनाला हरवण्यासाठी लढा देणाऱ्यांना थँक्यू म्हणत आहे. आत्तापर्यंत गुगलने वेगळ्या दिवशी प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांचा सन्मानार्थ डूडल तयार केले होते.
आज गुगलने या सर्वांना एकत्र डुडल तयार करून धन्यवाद म्हटले आहे. यामध्ये गुगलने फूड वर्कर्स, पॅकिंग अंड शिपिंग वर्कर्स, ग्रोसरी वर्कर्स, पब्लिक ट्रान्सपोर्टचे वर्कर्स, टीचर, सफाई कर्मचारी या सर्वांना धन्यवाद म्हटले आहे. यासाठी गुगल ने G या अक्षराचा वापर केला आहे. त्याचबरोबर लेटर्स ऐवजी कॅरेक्टर चा उपयोग केला आहे.
याआधी गुगलने सर्व डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे विशेष आभार मानले होते. तसेच कोरोना पासून बचाव करण्यासाठी काही टिप्स देखील दिल्या होत्या.